"म्हणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,७७६ बाइट्सची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
*'''आय नाय त्याला काय नाय.'''
- आपल्या कितीतरी चुका सगळ्यात जास्त आईच माफ करू शकते बाकी जगात कोणीही आपल्याशी इतकं चांगलं वागु शकत नाही . त्यामुळे जर आई आपल्या आजूबाजूला नसेल तर आपल्या बाजुने कोणी नाही हेच खरं असं म्हणावं .

*'''आराम हराम आहे.'''
- आपलं काम पूर्ण झालेलं नसताना आराम करणे , आळशीपणा करणे चुकीचा आहे .

*'''आरोग्य हीच धनसंपत्ती.'''
- सगळ्यात श्रेष्ठ धन आपल्या जवळ आहे ते म्हणजे आपलं शरीर .ते सुदृढ ठेवणे , व्यायाम करणं , योग्य आहार घेणे हेच सगळ्यात महत्वाचा आहे . इतर कोणत्याही धनसंचयाच्या मागे लागण्यापेक्षा शरीरावर लक्ष देणे सगळ्यात महत्त्वाचं .
*'''आरोग्य हीच धनसंपत्ती.'''

*'''आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?'''
- माकडाला कोणतीच सारासार बुद्धी नसते त्यामुळे हातात आलेली वस्तू किंवा एखादं भांड जर का भरलेले असेल तरीही तो ते उलट सुलट करून बघताना त्यातल्या वस्तू सांडून जातात तरीही त्याला ते समजत समजत नाही वस्तू सांभाळून ठेवण त्याला जमत नाही . मग त्याचा संसार कसा काय होणार ? हे रूपक आहे . खऱ्या आयुष्यात काही माणसं जबाबदारीने वागत नाही त्यामुळे त्यांच्या संसारात अडथळे येतात .
*'''आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?'''

*'''आला भेटीला धरला वेठीला.'''
- काही काही माणसं वागण्यामध्ये एवढी चलाख असतात ती त्यांना सहज भेटायला म्हणून कोणी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला सुद्धा ते कामाला लावू शकतात .

*'''आली अंगावर, घेतली शिंगावर.'''
- एखादी गोष्ट आज अचानक अंगावर आली /अचानक जबाबदारी अंगावर पडली तरीही तिचा स्वीकार करून योग्यप्रकारे तडीस नेणे व काम पूर्ण करणे.

*'''आली चाळीशी, करा एकादशी.'''
- सतत भितीच्या छायेत वावरणे .काहीतरी वाईट होईल या भीतीने सतत कोणते ना कोणते उपास तपास करत राहणे .

*'''आली सर तर गंगेत भर.'''
- थोडीशी बेफिकीर वृत्ती असणे . म्हणजे जर पाऊस पडला तर काय गंगेतच भर पडेल .

*'''आलीया भोगासी असावे सादर.'''
- जे भोग भोगणे आपल्या नशिबात आहे ते आपण स्वीकारायला हवं ! त्याबद्दल कुरकुर करून कसं चालेल ? जी कठीण परिस्थिती समोर आली आहे तिला शांतपणे समजून तोंड देणं व उपाय शोधणे हे करायलाच हवं.
५१

संपादने