मुख्य मेनू उघडा

Wikiquote β

म्हणी


विकिक्वोट
Look up म्हणी in
विकिपीडिया, the free marathi encyclopedia.
म्हणी हा लेखनाव/शब्द
विकिपीडिया, या मुक्त ज्ञानकोशात पाहा

स्वरसंपादन करा

- - - - - - - - - - अं - aअःa

मिश्रसंपादन करा

- ॠ - लृ - लॄ

व्यंजनसंपादन करा

क वर्ग -
च वर्ग -
ट वर्ग -
त वर्ग -
प वर्ग -
य वर्ग - क्ष ज्ञ
म्हणी संपादित करणाऱ्यांना नम्र सूचना. वाक्प्रचार व म्हणींमध्ये फरक आहे. वाक्प्रचार वाक्प्रचारांच्या स्वतंत्र लेखात टाकावेत.

स्वर असंपादन करा

  • अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.

....................................................................................................

  • अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.

....................................................................................................

  • अडला हरी गाढवाचे पाय धरी.

संस्कृतपर्यायः - वहेदमित्रं स्कन्धेन यावत्कालविपर्यय:।

....................................................................................................

  • अडली गाय खाते काय.

....................................................................................................

  • अंधारात अत्तराचे दिवे लावणे.

....................................................................................................

  • अंगापेक्षा बोंगा जास्ती.

....................................................................................................

  • अती झालं अन् हसू आलं.

....................................................................................................

  • अती तेथे माती.
  • संस्कृतपर्याय- अति सर्वत्र वर्जयेत्

....................................................................................................

  • अती परिचयात अवज्ञा.

....................................................................................................

  • अती राग भीक माग.

....................................................................................................

  • अती शहाणा त्याच अळवाला ठाऊक.

....................................................................................................

  • अंथरूण पाहून पाय पसरावे.

संस्कृतपर्यायः - विभवानुरूपम् आभरणम्

|} ....................................................................................................

  • असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.

संस्कृतपर्यायः - 1 न मूर्खजनसम्पर्क: सुरेन्द्रभवनेष्वपि।2 पावको लोहसङ्गेन मुद्गरैरभिहन्यते।

....................................................................................................

  • असतील चाळ तर फीटतील काळ.

....................................................................................................

  • असतील शिते तर जमतील भुते.

संस्कृतपर्याय- द्रव्येण सर्वे वशा:।

....................................................................................................

  • असतील मुली तर पेटतील चुली.

....................................................................................................

  • असून अडचण नसून खोळंबा.

....................................................................................................

  • असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.

....................................................................................................

  • असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.

....................................................................................................

  • अवघड जागी दुखणे आणि जावई वैद्य.

....................................................................................................

  • अती झाले मसणात गेले.

....................................................................................................

  • अंगावरचे लेणे चांभाराचे देणे

....................................................................................................

स्वर आसंपादन करा

  • आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी.
  • संस्कृतपर्याय-क्व रोग: क्व च भेषजम्?


  • आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार.
  • संस्कृतपर्याय-कूपे नास्ति कुत: कूप्याम्?
  • आयजीच्या जीवावर बायजी उदार
  • आधी पोटोबा मग विठोबा.

संस्कृतपर्यायः - उदरार्चामनु वेदे चर्चा


  • आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास.
  • आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
  • आपला तो बाळू दुसऱ्याचा तो कार्टा.
  • आपला हात जगन्नाथ.

संस्कृतपर्यायः - 1 आत्मायत्तौ वृद्धिविनाशौ।2 आत्मैव ह्यात्मनो बन्धु:


  • आपलेच दात आणि आपलेच ओठ.
  • आयजीच्या जिवावर बायजी उदार आणि सासूच्या **वर जावई सुभेदार.
  • आयत्या बिळात नागोबा.
  • आयत्या पिठावर रेघोट्या.
  • आलीया भोगासी असावे सादर.

संस्कृतपर्यायः - निर्वाह: प्रतिपन्नवस्तुनि सताम्।


  • आंधळं दळतंय अन कुत्रं पीठ खातंय.
  • आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन.
  • आधी लगीन कोंढाण्याचं.
  • आवडतीचा शेंबूड गोड आणि नावडतीचे मीठ अळणी.
  • आपलंच घर आणि हगून भर.
  • आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून.
  • आले देवाजिच्या मना तेथे कोणाचे चालंना.
  • आई जेवायला घालीना आणि बाप भीक मागु देईना.
  • आहे रेडा आणि म्हणे माझी धार काढा
  • आड जीभ खा‌ई अऩ पडजीभ बोंबलत जा‌ई.
  • आडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
  • आधणातले रडतात, सुपातले हसतात
  • आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
  • आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जा‌ईना, त्याचा येळकोट राहीना.
  • आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
  • आपण हसे दुसऱ्याला अन शेंबुड आपल्या नाकाला.

संस्कृतपर्यायः - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।

स्वर इसंपादन करा

  • इकडे आड, तिकडे विहीर.
  • संस्कृतपर्याय-इतो व्याघ्र इतस्तटी

स्वर ईसंपादन करा

  • ईडा पीडा टळो,बळीचे राज्य येवो.

स्वर उसंपादन करा

  • उचलली जीभ अन् लावली टाळ्याला.

संस्कृतपर्यायः - मुखमस्तीति वक्तव्यम्


  • उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग.


  • उथळ पाण्याला खळखळाट फार.

संस्कृतपर्याय- अर्धो घटो घोषमुपैति नूनम्।


  • उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी.

संस्कृतपर्याय- 1उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्मीः। 2 पुरुषकारम् अनुवर्तते दैवम्।


  • उघडीला भेटले लुगडे, मग हे झाकू की ते झाकू.

स्वर ऊसंपादन करा

  • ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
  • ऊसाच्या पोटी काऊस

स्वर एसंपादन करा

  • एक घाव दोन तुकडे.
  • एक ना धड भाराभर चिंध्या.
  • एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत.
  • एकादशीच्या घरी शिवरात्र.
  • गण्डस्य उपरि पिटक:
  • एका कानावर पगडी, घरी बाई उघडी.
  • एका हाताने टाळी वाजत नाही.

संस्कृतपर्यायः - नैकेन चक्रेण गती रथस्य।


  • एकटा जीव सदाशिव.
  • एकमेकां सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ|
  • एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारू नये.

स्वर ऐसंपादन करा

  • ऐकावे जनाचे करावे मनाचे.

संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:


  • ऐट राजाची अऩ वागणूक खेकड्यांची.
  • ऐन दिवाळीत दाढदुखी.

स्वर ओसंपादन करा

स्वर औसंपादन करा

  • औट घटकेचे राज्य.
  • औषधा वाचून, खोकला गेला.

स्वर अंसंपादन करा

* अंथरूण पाहून पाय पसरावेत.
  • अंगावर आल्या गोणी, तर बळ धरले पाहिजे तुनी.
  • अंधेर नगरी चौपट राजा.

स्वर अःसंपादन करा

मिश्र ऋसंपादन करा

  • ऋषींचे कूळ आणि नदीचे मूळ शोधू नये.
  • ऋषी पंचमीचा बैल.
  • ऋण काढून तूप प्यावे.

मुळाक्षर कसंपादन करा

  • कानामागून आलीअन तिखट झाली
  • कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.
  • कळते पण वळत नाही.
  • कर नाही त्याला डर कशाला?

संस्कृतपर्यायः -कर्तव्यदक्षस्य कुतो भयं स्यात्?


  • करावे तसे भरावे.

संस्कृतपर्यायः - 1 यथा कर्म तथा फलम्।2 कर्मायत्तं फलं पुंसाम्।


  • करायला गेले नवस आज निघाली अवस
  • काळ आला होता पण वेळ नाही.
  • काखेत कळसा गावाला वळसा.

संस्कृतपर्यायः - कटीकलशमन्वेष्टुं नगरे भ्रमणं यथा।


  • काट्याने काटा काढावा.

संस्कृतपर्यायः - 1 आयसैरायसं छेद्यम्। 2 कण्टकेन एव कण्टकम्।


  • कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी.

संस्कृतपर्यायः -1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:


  • कावळा बसायला आणि फांदी मोडायला एकच गाठ.
  • कुंभार तसा लोटा.

संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।


  • कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ.
  • कोल्ह्याला द्राक्षे आंबट.
  • कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही.

संस्कृतपर्यायः - सत्यमेव जयते।


  • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

संस्कृतपर्यायः -न काकशापेन म्रियेत धेनु:।


  • कशात काय अन फाटक्यात पाय.
  • केवड्याचे दान वाटले आणि गावात नगारे वाजले.
  • करून गेला गाव आणि कांदळकराचे नाव.
  • कुठे इंद्राचा ऐरावत,अन् कुठे शामभट्टाची तट्टाणी?

संस्कृतपर्यायः -क्व सूर्य: क्व च खद्योत:?


  • केल्याने होत आहे रे, म्हणून आधी केलेची पाहिजे.
  • काम नाही घरी अन् सांडून भरी.
  • कंबरेच सोडला आणि डोक्याला बांधला.
  • कण्हती कुथती, मलिद्याला उठती.
  • काजव्याकडून सुर्याची समीक्षा.
  • काम ऩ धंदा, हरी गोविंदा.
  • कावळ्याचे दांत शोधण्यासारखे.
  • कुठे जाशी भोगा तर तुझ्या पाठी उभा.
  • कोंबडे झाकले म्हणून उजडायचे राहत नाही.
  • कोणाला कशाचं तर बोड्कीला केसाचं.
  • कोल्हा काकडीला राजी.

संस्कृतपर्यायः -क्षुद्र: क्षुद्रेण तुष्यति।


  • कोळसा उगाळावा तितका काळाच.

संस्कृतपर्यायः -न निम्बवृक्षो मधुरत्वमेति।


  • कंड भारी उड्या मारी.
  • काना मागुन आली तिखट झाली.
  • कुई म्हणलं तर कुल्ला कापीन.
  • कळना ना वळना, भाजी भाकरी गिळना.
  • कुणी सरी घातली म्हणून आपण फास घेऊ नये.
  • काडीची नाही खबर म्हणे मी अकबर.

मुळाक्षर खसंपादन करा

  • खाई त्याला खवखवे.
  • खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी.

संस्कृतपर्यायः - सुन्दरी वा दरी वा।


  • खाण तशी माती.

संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।


  • खाणा-याचे खपते, कोठाराचे पोट दुखते.
  • खायला काळ भुईला भार.

संस्कृतपर्यायः - पुरुषार्थहीना: भुवि भारभूता:


  • खायला कोंडा अन निजेला धोंडा.
  • खाली मुंडी, पाताळ धुंडी.
  • खऱ्याचं खोटं अन लबाडाचं तोंड मोठं
  • खिशात नाय जाट पण इस्त्री मात्र ताठ

मुळाक्षर गसंपादन करा

  • गरज सरो,वैद्य मरो.

संस्कृतपर्यायः - 1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्।2 सङ्कटे व्यङ्कटेश:


  • गरजवंताला अक्कल नसते.
  • गर्जेल तो पडेल काय?

संस्कृतपर्यायः -गर्जन्त: नैव वर्षन्ति।


  • गर्वाचे घर खाली.

संस्कृतपर्यायः - अतिदर्पे हता लङ्का।


  • गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.

संस्कृतपर्यायः - हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।


  • गाव करी ते राव न करी.

संस्कृतपर्यायः - 1 तृणैः गुणत्वम् आपन्नैः बध्यन्ते मत्तदन्तिन:।2 संहति: कार्यसाधिका।  • गवयाचं पोर सुरात रडतं.
  • गाड्याबरोबर नळाची यात्रा.

संस्कृतपर्यायः - पुष्पमालानुषङ्गेण सूत्रं शिरसि धार्यते।


  • गाढवाला गुळाची चव काय?

संस्कृतपर्यायः -काक: पद्मवने रतिं न कुरुते।


  • गाढवी प्रेम अन लाथांचा सुकाळ
  • गाता गळा, शिंपता मळा.
  • गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता.

संस्कृतपर्यायः - काक: पद्मवने रतिं न कुरुते।


  • गावचा तो पांड्या, बाहेरचा तो देशपांड्या

संस्कृतपर्यायः -अतिपरिचयादवज्ञा।


  • गुलाबाच्या झाडाला वडाचा पार, आन वासराच्या पाठीवर नांगराचा भार
  • गुलाबाचे काटे, तसे आईचे धपाटे.
  • गुरूची विद्या गुरूस फळली.
  • गोगल गाय पोटात पाय.

संस्कृतपर्यायः - विषकुम्भ: पयोमुख:

मुळाक्षर घसंपादन करा

  • घर फिरलं की घराचे वासे पण फिरतात.
  • घरोघरी मातीच्या चुली.
  • घरचं झालं थोडं अन् व्याह्यांनी धाडलं घोडं.
  • घर पाहावं बांधून.
  • घरात नाही दाणा तरी मला बाजीराव म्हणा.
  • घर पाहवं बांधून आणि लग्न पहावं करुन.
  • घरची करते देवा देवा आणि बाहेरचीला चोळी शिवा.
  • घोडा मैदान जवळच आहे.
  • घोडं मेलं ओझ्यानं आणि शिंगरू मेलं हेलपाट्यानं
  • घर ना दार देवळी बिर्‍हाड.
  • घेतला वसा टाकू नये.

संस्कृतपर्यायः - प्रारब्धमुत्तमजना न परित्यजन्ति।

मूळाक्षर चसंपादन करा

  • चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे.
  • चार सुगरणी तरी सैपाक अळणी
  • चोर सोडून सन्याश्याला फाशी.

संस्कृतपर्यायः -चौरापराधे माण्डव्यदण्ड:।


  • चोराच्या उलट्या बोंबा.

संस्कृतपर्यायः - स्वयमशुद्ध: परान् आशङ्कते।


  • चोराच्या मनात चांदणे.
  • चोराच्या हातची लंगोटी.
  • चिलटांची लढाई आणि नुसती बडाई.

मुळाक्षर छसंपादन करा

  • छडी लागे छमछम विद्या येई घमघम.

मुळाक्षर जसंपादन करा

  • जंगलात नाही वावर आणि गावात नाही घर.
  • जगाच्या कल्याणा संताची विभुती.
  • जनाची नाही तरी मनाची तरी जरा.
  • जनात बुवा आणि मनात कावा.
  • जन्मा आला हेला, पाणी वाहता मेला.
  • जामात दशम ग्रह.
  • जया अंगी मोठेपणं त्यास यातना कठिण.
  • जलात राहून माशाशी वैर कशाला?
  • जळतं घर भाड्याने कोण घेणार?
  • जवा येतील चांगली येळ, गाजराच बी व्हतय केळं.
  • जशास तसे.

संस्कृतपर्यायः - 1 अपराधानुरूपो दण्ड:।2 वचनानुरूपं प्रतिवचनम्।3 शठे शाठ्यम्।


  • जशी कामना तशी भावना.
  • जशी देणावळ तशी धुणावळ.
  • जशी नियत तशी बरकत.
  • जसा गुरु तसा चेला.
  • जसा भाव तसा देव.
  • जा‌ईचा डोळा नि आसवांचा मेळा.
  • जातीच्या सुंदराला सर्व काही शोभते.

संस्कृतपर्यायः -किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम्?


  • जातीसाठी खावी माती.
  • जात्यातले रडतात सुपातले हसतात.
  • जात्यावर बसले की ओवी सुचते.
  • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही.
  • जाळाशिवाय नाही कढ अऩ माये शिवाय नाही रड.
  • जावई पाहुणा आला म्हणून रेडा दुध देईल काय?
  • जावई माझा भला आणि लेक बाईलबुध्या झाला.
  • जावयाचं पोर हरामखोर.
  • जावा जावा आणि उभा दावा.
  • जावा जावा हेवा देवा.
  • जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
  • जिकडे सु‌ई तिकडे दोरा.
  • जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
  • जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उध्दारी.
  • जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.

संस्कृतपर्यायः - स्वभावो दुरतिक्रम:।


  • जिथे कमी तिथे आम्ही.
  • जी नाही गोंदणार ती नाही नांदणार.
  • जुनं ते सोनं नवं ते हवं.
  • जुने ते सोने.
  • जे न देखे रवि ते देखे कवी.

संस्कृतपर्यायः - कवि: द्रष्टा रवे: अपि।


  • जे पिंडी ते ब्रम्हांडी.
  • जे फुकट ते पौष्टीक.
  • जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
  • जेथें नगाऱ्याची घाई तेथें टिमकी काय जाई
  • जेवान जेवाव पंगतीत अन मरान मागावं उमदीत.
  • जो गुण बाळा तो जन्म काळा.
  • जो नाक धरी, तो पाद करी.
  • जो श्रमी त्याला काय कमी.
  • जोकून खाणार, कुंथुन हागणार.
  • जोवरी पैसा तोवरी बैसा.
  • ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी.
  • ज्या गावाला जायचे नाही त्य गावचा रस्ता विचारू नये.
  • ज्याचं करावं भलं तोच म्हणतो आपलचं खर.
  • ज्याचं जळतं त्यालाच कळतं.
  • ज्याचं त्याला आणि गाढव वझ्याला.
  • ज्याचा त्याला चोप नाही आणि शेजाराला झोप नाही.
  • ज्याची खावी भाकरी त्याची करावी चाकरी.
  • ज्याची दळ त्याचे बळ.
  • ज्याचे करावे भले, तो म्हणतो आपलेच खरे.
  • ज्याचे पदरी पाप त्याला मुली आपो‌आप.
  • ज्याच्या हाती ससा तो पारधी.
  • ज्याच्यासाठी लुगडं तेच उघडं.
  • ज्याला आहे भाकरी त्याला कशाला चाकरी.
  • ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
  • ज्याला समजावा कोरड्या पाटीचा तोच निघाला आतल्या गाठीचा.
  • ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?

मुळाक्षर झसंपादन करा

  • झालं गेलं गंगेला मिळालं.
  • झोपून हागणार उठून बघणार
  • झाकली मुठ सव्वा लाखाची

संस्कृतपर्यायः - 1 आत्मच्छिद्रं न प्रकाशयेत्।2 रक्षेद् विवरम् आत्मन:।

मुळाक्षर टसंपादन करा

  • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.

संस्कृतपर्यायः - हेम्न: संलक्ष्यते ह्यग्नौ विशुद्धि: श्यामिकापि वा।


  • टाळी एका हाताने वाजत नाही.

मुळाक्षर ठसंपादन करा

  • ठकास महाठक.

मुळाक्षर डसंपादन करा

मुळाक्षर ढसंपादन करा

  • ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला.
  • ढुंगणाला नाही लंगोटी आणि मला म्हणा दिपुटी.

मुळाक्षर णसंपादन करा

मुळाक्षर तसंपादन करा

  • तळे राखील तो पाणी चाखील.

संस्कृतपर्यायः - रक्षको भक्षयेदेव।


  • तुपात तळले, साखरेत घोळले तरी कारले कडू ते कडूच.
  • तुझं माझं जमेना अन तुझ्या वाचुन करमेना.
  • तेलही गेले, तुपही गेले, हाती आले धुपाटणे.

संस्कृतपर्यायः - अतो भ्रष्ट: ततो भ्रष्ट:।


  • ताकाला जाऊन भांडे लपवू नये.
  • त वरून ताकभात.
  • तेरड्याचा रंग तिन दिवस.
  • तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या.
  • तुला न मला घाल कुत्र्याला
  • तवा खातो भाकर चुल्हा भुकेला, पोहरा पितो पाणी रहाट तहानलेला
  • तहान लागल्यावर विहीर खणणे.

संस्कृतपर्यायः - सन्दीप्ते भवने तु कूपखननं प्रत्युद्यम: कीदृश:?


  • तोंड दाबून बुक्क्यांचा मार
  • तेलजीचं तेल जळे मशालजीची --ड जळे.

मुळाक्षर थसंपादन करा

  • थेंबे थेंबे तळे साचे.

संस्कृतपर्यायः - बिन्दुश: पूर्यते सिन्धु:।


  • थांबला तो संपला.

मुळाक्षर दसंपादन करा

  • दगडापेक्षा वीट मऊ.

संस्कृतपर्यायः - पाषाणादिष्टिका वरा।


  • दाम करी काम.

संस्कृतपर्यायः -1 द्रव्येण सर्वे वशा:।2 सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते।


  • दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत.
  • दिव्याखाली अंधार.
  • देखल्या देवा दंडवत.
  • देव तारी, त्याला कोण मारी.

संस्कृतपर्यायः - अरक्षितं तिष्ठति दैवरक्षितम्।


  • देवाची करणी आणि नारळात पाणी.
  • देश तसा वेष, राजा तशी प्रजा.

संस्कृतपर्यायः - 1 यथा देशस्तथा वेश:।2 यथा राजा तथा प्रजा।


  • दैव देते आणि कर्म नेते.
  • दुधाने पोळलेला ताकही फुंकून पितो.
  • दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.
  • दुभत्या गायीच्या लाथा गोड.
  • दूरून डोंगर साजरे.
  • दुष्काळात तेरावा महिना.

संस्कृतपर्यायः -गण्डस्य उपरि पिटक:


  • दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ.
  • दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं.
  • दिवस गेला उटारेटी, चांदण्यात बसली कापूस वेचीत.
  • दिसतं तस नसतं म्हणून तर जग फसतं.
  • दुःख रेड्याला न डाग पखालीला.
  • दुखणे हत्तीच्या पायाने येते आणि मुंगीच्या पायाने जाते.*
  • दृष्टी आड सृष्टी.
  • देवाचं नावं अऩ स्वताच गावं.
  • दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी.
  • देणं न घेणं आणि कंदील घेऊन येणं.
  • दिवस गेला उठारेटी चांदण्याचे पोहे कुटी.
  • दीड दिवसात अन कोल्हं उसात.
  • देह देवळात अन चित्त पायताणात.
  • देवाघरचा पवा वाजतो कवा कवा.
  • दे दान सुटे गिऱ्हाण.
  • दे गा हरी पलंगावरी।

मुळाक्षर धसंपादन करा

  • धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय.

मुळाक्षर नसंपादन करा

  • न खाणार्‍या देवाला नैवेद्य.
  • नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न.
  • नकटे असावे पण धाकटे असू नये.
  • नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा.
  • नावडतीचं मीठ अळणी.
  • नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे.
  • निंदकाचे घर असावे शेजारी.
  • न्हाणीला बोळा अन् दरवाजा मोकळा.
  • नाकापेक्षा मोती जड.

संस्कृतपर्यायः -गात्राद् गुरु: अलङ्कार:।


  • नाक नाही धड अन् तपकीर ओढ
  • नवर्‍याने मारलं आणि पावसाने झोडपलं तरी तक्रार कुणाकडे करायची?
  • न कर्त्याचा वार शनिवार.
  • नरो वा कुंजरो.
  • नव्याची नवला‌ई.
  • नव्याचे न‌ऊ दिवस.
  • नाकपेक्षा मोती जड.
  • नागड्या कडे उघडा गेला आणि हिवाने मेला.
  • नागोबा म्हसोबा पेंश्याला दोन, पंचमी झाल्यावर पुजतयं कोण?
  • नाचता ये‌ईना म्हणे अंगण वाकडे, स्वयंपाक ये‌ईना म्हणे ओली लाकडे.
  • नात्याला नाही पारा, निजायला नाही थारा.
  • नाव गंगुबा‌ई अऩ तडफडे तहानेने.
  • नाव मोठे लक्षण खोटे.
  • नेमीच येतो मग पावसाळा
  • नाज़ुक नार चाबकाचा मार
  • नाव सोनुबाई हाती कथिलाचा वाळा
  • निजुन हागायचं आणि उठुन बघायचं.
  • नाक कापले तरी दोन भोके आहेत.
  • नाचता येईना अंगण वाकडे अन रांधता येईना ओली लाकडे.
  • न कर्त्याचा वार शनिवार.
  • न लागो पुत्राचा हात पण लागो डोंब्या महाराची लाथ.
  • नकटे व्हावे पण धाकटे हो‌ऊ नये.
  • नको तिथं बोटं घालू नये, घातलेच तर वास घेत बसू नये.
  • नगाऱ्याची घाय तिथे टिमकीचे काय?
  • नमनाला घडाभर तेल.
  • नवरा केला सुखासाठी, पैसा नाही कुकासाठी.
  • नवरा नाही घरी सासरा जांच करी.
  • नवा कावळा शेण खायला शिकला.
  • नव्याची नवला‌ई.
  • ना घरचा ना घाटचा.
  • नांदणाऱ्याला पळ म्हणायचे आणि पळणाऱ्याला नांद म्हणायचे.
  • नांव अन्नपुर्णा, टोपल्यात भाकर उरेना.
  • नांव गंगाबा‌ई, रांजनात पाणी नाही.
  • नांव महीपती, तीळभर जागा नाही हाती.
  • नांव मोठे लक्षण खोटे.
  • नांव सगुणी करणी अवगुणी.
  • नांव सुलोचना आणि डोळ्याला चष्मा.
  • नांव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा
  • नाकावर पदर अन विशीवर नजर.
  • नाम असे उदार कर्ण, कवडी देता जा‌ई प्राण.
  • नारो शंकराची घंटा.
  • नालासाठी घोडं.
  • नाव्ह्याचा उकरंडा कितीही उकरला तरी केसच निघणार.
  • नाही चिरा, नाही पणती.
  • नाही निर्मल मन काय करील साबण.
  • निर्लज्याच्या गांडीवर घातला पाला गार लागला अजून घाला.
  • नेमेचि येतो मग पावसाळा.
  • नेशीण तर पैठणी नाहीतर नागवी बसेन.
  • न्हाणीला बोळा आणि दरवाजा मोकळा.

मुळाक्षर पसंपादन करा

  • पदरी पडले आणि पवित्र झाले.

संस्कृतपर्यायः - 1 अङ्गीकृतं सुकृतिन: परिपालयन्ति।2 प्राप्तं प्राप्तमुपासीत।

पायावर पाय ठेवुन चालने

  • पडतील स्वाती तर पिकतील मोती.
  • पडत्या फळाची आज्ञा.
  • पडलो तरी नाक वर.
  • पहिले पाढे पंच्चावन्न.
  • पाण्यात राहून माशाशी वैर करु नये.
  • पालथ्या घडयावर पाणी.

संस्कृतपर्यायः - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।


  • पाचामुखी परमेश्वर.
  • पादा पण नांदा.
  • पाचही बोटं सारखी नसतात.
  • पाटलाचं घोडं महाराला भुषण.
  • पाण्यात राहून माशाशी वैर?

संस्कृतपर्यायः - नक्र: स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति।


  • पाण्यात म्हैस वर मोल.
  • पाण्यावाचून मासा झोपा घे‌ई केसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे.
  • पादऱ्याला पावट्याचे निमित्त.
  • पी हळद अन् हो गोरी..
  • पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
  • पुरूषाचे मरण शेती, बायकांचे मरण वेती.
  • पेरावे तसे उगवते.
  • पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम
  • पिंडीवर बसला म्हणून विंचवाची गय करुन चालत नाही.
  • पंकज वर पाण्याचा मोती होतो.
  • प्रथमग्रासे मक्षिकापातः
  • प्रयत्नांती परमेश्वर.
  • प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे.
  • पाषाणाला पुरणपोळी, माणसाला शिळीपोळी (शिवीगाळी)
  • पाहुण्याच्या काठीने साप मारणे.

संस्कृतपर्यायः - परस्य दण्डेन अपरस्य ताडनम्।

मुळाक्षर फसंपादन करा

मुळाक्षर बसंपादन करा

  • बळी तो कां पिळी

संस्कृतपर्यायः - वीरभोग्या वसुन्धरा


  • बैल गेला अन् झोपा केला.

संस्कृतपर्यायः - निर्वाणदीपे किमु तैलदानम्?


  • बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.
  • बारा लुगडी तरी बाई उघडी.
  • बडा घर पोकळ वासा.
  • बळी तो कान पिळी.
  • बाईल वेडी लेक पिसा, जावई मिळाला तोहि तसा.
  • बाजारात तुरी भट भटणीला मारी.
  • बाप दाखव नाही तर श्राध्दं कर.
  • बाबा गेला आणि दशम्याही गेल्या.
  • बाळाचे पाय पाळ्ण्यात दिसतात.
  • बुडत्याचे पाय खोलात.

संस्कृतपर्यायः - विवेकभ्रष्टानां भवति विनिपात: शतमुख:।


  • बुडत्याला काडीचा आधार.
  • बेशरमाच्या ढुंगणाला फुटले झाड तो म्हणतो मला सावली झाली.
  • बोलण्यात पट्टराघू, कामाला आग लावू.
  • बोलाचीच कढी अऩ बोलाचाच भात.

संस्कृतपर्यायः - वचने का दरिद्रता?


  • बोलेल तो करेल काय? गरजेल तो पडेल काय?
  • बाप तसा बेटा, संडास तसा लोटा

संस्कृतपर्यायः - यथा बीजं तथाङ्कुर:।


  • बाइल गेली अन सोपा केला.

मुळाक्षर भसंपादन करा

  • भटाला दिली ओसरी भट हात पाय पसरी.
  • भरवशाच्या म्हशीला टोणगा.
  • भीक नको पण कुत्रा आवर.
  • भित्यापाठी ब्रह्मराक्षस.

संस्कृतपर्यायः - भीतं भापयते विधि:


  • भुकेला कोंडा, निजेला धोंडा.
  • भरल्या ब्राह्मणाला दही करकरीत.
  • भुकेच्या तापे करवंदीची कापे.
  • भुकेला पिकलं काय? अऩ हिरवं काय?
  • भले भले गेले गोते खात, झिंझुरटे म्हणे माझी काय वाट?
  • भुरट्याला तुरा, तर पोशिंद्याला धतुरा

मुळाक्षर मसंपादन करा

  • मरावे परी कीर्तीरुपे उरावे.
  • मातीचे कुल्ले वाळले कि पडायचेच.
  • मन चिंती ते वैरीही न चिंती.
  • मनी वसे ते स्वप्नी दिसे.
  • मला नं तुला, घाल कुत्र्याला.
  • मला पहा अऩ फुले वहा.
  • महापुरे जेथे झाडे जाती, तेथे लव्हळी वाचती.
  • माकड म्हणतं माझीच लाल.
  • माकडाच्या हातात कोलीथ.
  • माणूस पाहून शब्द टाकावा, अऩ जागा पाहून घाव मारावा.
  • माय मरो पण मावशी उरो.
  • मिया मुठभर, दाढी हातभर.
  • मी नाही त्यातली अऩ कडी लावा आतली.
  • मेल्या म्हशीला शेरभर दुध.
  • मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
  • मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही.
  • मोडेन पण वाकणार नाही.
  • मोर नाचला म्हणून लांडोराने नाचू नये.

संस्कृतपर्यायः -न देवचरितं चरेत्


  • मोह सुटेना अऩ देव भेटेना.
  • म्हननाऱ्यानं म्हण केली, अऩ जाननाराले अक्कल आली.
  • म्हसोबाला नव्हती बायको अऩ सटवीला नव्हता नवरा.
  • म्हातारीला मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो.
  • मांडीखाली आरी अन चांभार पोरे मारी
  • माशीची धाव जखमेवर.

मुळाक्षर यसंपादन करा

  • येरे माझ्या मागल्या.
  • यथा राजा तथा प्रजा.
  • येळला केळं अऩ वनवासाला सिताफळं.

मुळाक्षर रसंपादन करा

  • रंग झाला फिका आणि दे‌ईना कुणी मुका.
  • राजा उदार झाला अऩ हाती भोपळा दिला.

संस्कृतपर्यायः -दातृत्वमीदृशं तेषां न गले न च तालुके।


  • राजा तशी प्रजा.
  • राजा बोले अऩ दल चाले.
  • राजाला दिवाळी काय ठा‌ऊक?
  • रात्र थोडी अन् सोंग फार.
  • राव गेले पंत चढले
  • रिकामा न्हावी भिंतीला तुंबड्या लावी.
  • रोज मरे त्याला कोण रडे.

संस्कृतपर्यायः - अतिपरिचयादवज्ञा


  • रोज घालतंय शिव्या अन एकादशीला गातंय वव्या
  • रिकामा सुतार बायकोचे कुल्हे ताशी.

मुळाक्षर लसंपादन करा

  • लंकेत सोन्याच्या विटा.

संस्कृतपर्यायः - शून्यालये दीपवत्


  • लग्न बघावे करून अऩ घर पहावे बांधून.
  • लबाडाचे आमंत्रण जेवल्याबिगर खोटे.
  • लहान तोंडी मोठा घास.

संस्कृतपर्यायः - लघुतुण्डे गुरुपिण्ड:


  • लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, संपत्ती, आरोग्य लाभे.
  • लाखाचे बारा हजार.
  • लाथ मारेन तिथे पाणी काढीन.
  • लेकी बोले सुने लागे.
  • लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण.
  • लगा लगा मला बघा.

मुळाक्षर वसंपादन करा

  • वराती मागून घोडे.
  • वळ ऊठला पण संशय फिटला.
  • वळणाचे पाणी वळणाला.

संस्कृतपर्यायः - प्रकृतिं यान्ति भूतानि


  • वाचेल तो वाचेल.
  • वाजे पाउल आपले म्हणे मागून कोण आले.
  • वासरात लंगडी गाय शहाणी.

संस्कृतपर्यायः - निरस्तपादपे देशे एरण्डोऽपि द्रुमायते।


  • विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
  • वेळ ना वखत आऩ गाढव चाललय भुकत.
  • वाळूत मुतलं फेस ना पाणी.
  • वाचाळ सासु, नाठाळ सून.

मुळाक्षर शसंपादन करा

  • शहाण्याला शब्दाचा मार.

संस्कृतपर्यायः - सुखतरमाराध्यते विशेषज्ञः।


  • शिजे पर्यंत दम धरवतो, निवे पर्यंत धरवत नाही.
  • शितावरून भाताची परीक्षा.

संस्कृतपर्यायः - पिण्डेन ब्रह्माण्डपरीक्षणं स्यात्।


  • शिर सलामत तर पगड़ी पचास.
  • शुभ बोल नाऱ्या.
  • शेरास सव्वाशेर.
  • शेळी जाते जीवनीशी, खाणारा म्हणतो वातड कशी.
  • शेंडी तुटो की पारंबी तुटो.

संस्कृतपर्यायः - 1 शापादपि शरादपि 2 येन केन प्रकारेण

मुळाक्षर षसंपादन करा

मुळाक्षर ससंपादन करा

  • सगळं मुसळ केरात.

संस्कृतपर्यायः - अरण्यरुदितं कृतं श्वपुच्छम् अवनामितम्।


  • सतरा पुरभय्ये अऩ अठरा चुली.
  • सत्या असत्या मन केले ग्वाही

संस्कृतपर्यायः - प्रमाणम् अन्त:करणप्रवृत्तय:


  • सत्तेपुढे शहाणपण चालत नाही

संस्कृतपर्यायः - 1 प्रभुर्विभु: स्यात्।2 प्रभोरिच्छा बलीयसी।


  • सरड्याची धाव कुंपणापर्यंत.
  • साखरेचे खाणार द्याला देव देणार.
  • साठी बुध्दी नाठी.
  • सात सुगरणी, भाजी अळणी.
  • साता उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी संपूर्ण.
  • साप म्हणू नये धाकला, नवरा म्हणू नये आपला.
  • सासू न सासरा जांच करे तिसरा.
  • सासू नाही घरी, नणंद जाच करी.
  • सासू मेली ठीक झाले, घरदार हाती आले.
  • सासू सांगे सुने बोध, आपण पी ऊन ऊन दुध.
  • सासू सुनेची भांडणं, सगळ्या गावाला आमंत्रणं.
  • सुंठेवाचून खोकला गेला.
  • सु‌ईण आहे, तो बाळंत हो‌ऊन घ्यावे.
  • सुसरबा‌ई, तुझी पाठ म‌ऊ.
  • सुख जवां एवढे दु:ख पर्वताएवढे.
  • सोन्याहून पिवळे.
  • स्वामी तिन्ही जगाचा आ‌ईविना भिकारी.
  • सहा महिने नळकांडात घातले तरी कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
  • सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही.

संस्कृतपर्यायः - स्वभावो दुरतिक्रम:।

मुळाक्षर हसंपादन करा

  • हलवायाच्या घरावर तुळशीपत्र.
  • हत्ती गेला आणि शेपूट राहिलं.
  • हा सूर्य हा जयद्रथ.
  • हात काढणे
  • हात फिरे तिथे लक्ष्मी वसे.
  • हातचे सोडून पळत्याच्या मागे.

संस्कृतपर्यायः - श्व: मयूराद् अद्य कपोतो वर:।


  • हाताची पाची बोटे सारखी नसतात.

संस्कृतपर्यायः - पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना


  • हातच्या कंकणाला आरसा कशाला?

संस्कृतपर्यायः - प्रत्यक्षदृष्टे न तु मानमन्यत्


  • हात दाखवून अवलक्षण कशाला?
  • हौस राजाची अन नांदणुक कैकाड्याची

मुळाक्षर ळसंपादन करा

मुळाक्षर क्षसंपादन करा

मुळाक्षर ज्ञसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा