"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७९:
==इतरांचे आंबेडकरांबद्दल विचार==
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही व्यक्तींची मते/विधाने/विचार खालिलप्रमाणे आहेत.
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''जगातल्या महापुरुषांचा इतिहास अगदी सारखा आहे, पण आंबेडकर हा या जगात एकच असा महात्मा होऊन गेला की यमयातनेच्या ज्या भयंकर अग्निदिव्यातून त्याला सारा जन्म जावे लागते, तसे जगातल्या दुसऱ्या कोणाही महापुरुषाला जावं लागले नसेल. आंबेडकर जर ब्रिटिशांचे हस्तक आणि देशद्रोही असते तर त्यांना उघडपणे ब्रिटिश सरकारची नोकरी पत्करून परमोच्च सन्मानाचे पद मिळवता आले असते! त्यांच्यासारख्या अलौकिक बुद्धीच्या आणि विद्वत्तेच्या माणसाला ब्रिटिशांच्या राज्यात दुष्प्राप्य असे काय होते? बरे, काँग्रेसमध्ये प्रवेश करून महात्मा गांधींची कृपा संपादन करण्याचे त्यांनी मनात आणले असते तर तीही गोष्ट त्यांना काही अवघड नव्हती. काँग्रेसमध्ये त्यांनी पंडित नेहरूंच्या बरोबरीने सारे सन्मान मिळविले असते. त्यांच्या विद्वत्तेचा आणि सामर्थ्यांचा एकही माणूस आज काँग्रेसमध्ये नाही. पण ब्रिटिशांची सेवावस्त्रे त्यांनी अंगावर धारण केली नाहीत किंवा काँग्रेसच्या ‘देशभक्ती’ चा गणवेशही अंगावर त्यांनी चढविला नाही! सात कोटी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांनी सर्व सुखाचा, सन्मानांचा आणि लोकप्रियतेचा त्याग करून सर्वागावर काटेरी वस्त्रे चढविली आणि आपले जीवन रक्तबंबाळ करून घेतले.''| source = ''' ''- प्रल्हाद केशव अत्रे'' '''}}
 
{{Quote box |quoted=true |bgcolor=#F5F6CE|salign=right| quote = ''नवभारताच्या घटनेचे प्रमुख शिल्पकार, लोकशाहीचे त्राते नि मानवी स्वातंत्र्याचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे आधुनिक भारताच्या इतिहासाचे एक महान पर्व आहे. मानवी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे ते एक सोनेरी पान आहे. स्वत:च्या बुद्धिमत्तेवर विसंबून राहून जो गाढ तपश्चर्येने, अलौकिक धैर्याने नि अखंड उद्योगशीलतेने उच्च ध्येयासाठी अविरत झगडतो तो धुळीतून धुरंधराच्या मालिकेत जाऊन कसा विराजमान होतो हे सिद्ध करणारे उदाहरण आधुनिक भारतात अन्यत्र सापडणे कठीण आहे, परमपूज्य डॉ. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना बौद्धधर्माची दीक्षा दिली. भारतीय समाजाला सामाजिक समतेची, मानव्याची नि बुद्धिप्रामाण्यवादाची जाणीव देणारा हा धर्म आहे. त्यात कारुण्य नि विवेक यांचे दर्शन घडते. बौद्ध धर्माची दीक्षा देऊन भारतातील लोकशाहीनिष्ठ समाजवादाला त्यांनी नैतिक अधिष्ठान दिले आहे, असे म्हणणे योग्य होईल. बौद्ध धर्म देव मानीत नाही. आत्मा मानीत नाही. अर्थात मूर्तीची पूजा करून देव पावतो, असे आता त्यांच्या अनुयायांना म्हणता येणार नाही. मोक्षप्राप्तीची व स्वर्गाची कल्पना सोडून दिली पाहिजे. पूज्य बाबासाहेबांनीच सांगून ठेवले आहे, की मरणोत्तर मोक्षप्राप्तीकरिता तळमळणारी वृत्ती ही काल्पनिक आहे. स्वर्गीय नंदनवनावर खिळलेली दृष्टी ही आजच्या परिस्थितीत आत्मघातकी ठरली आहे.''| source = ''' ''- [[w:धनंजय कीर|धनंजय कीर]], बाबासाहेबांच्या चरित्रात'' '''}}