मराठी वाक्प्रचार
अर्थ न समजता पाठ करणे
अ - आ - इ - ई - उ - ऊ - ए - ऐ - ओ - औ - अं - अः
क वर्ग - क ख ग घ ङ
च वर्ग - च छ ज झ ञ
ट वर्ग - ट ठ ड ढ ण
त वर्ग - त थ द ध न
प वर्ग - प फ ब भ म
अवर्गीय व्यंजने: य, र, ल, व, श, ष, स, ह, ळ ही "अवर्गीय व्यंजने" होत.
क्ष व ज्ञ ही संयुक्त व्यंजने होत.
मूळाक्षर अ
संपादन- अजरामर होणे = कायम स्मरणात राहणे
- अन्नास जागणे = उपकार स्मरणे
- अटकळ बांधणे
- अठरा विश्वे दारिद्र्य असणे. = कायम स्वरूपी दारिद्रय असणे.
- अक्षय असणे = चिरंजीव असणे
- अंग काढून घेणे = संबंध तोडणे, जबाबदारी टाळणे
- अंग चोरणे = कामात कुचराई करणे
- अंगा खांद्यावर खेळणे
- अंगापेक्षा बोंगा मोठा
- अंगात पाणी असणे
- अंगाला भोक पडणे.
- अंगाशी येणे = नुकसान होणे.
- अंगावर येणे
- अंगी लागणे
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अंगावर काटा उभा राहणे
- असतील फ़ळे तर होतील बिळे
- अट्टाहास करणे.
- अनभिज्ञ असणे.
- अंगी ताठा भरणे.
- अंगाला होणे.
- अप्रूप वाटणे.
- अमलात आणणे.
- अभंग असणे.
- अभिलाषा धरणे.
- अवाक होणे.
- अपूर्व योग येणे.
- अनमान करणे.
- अन्नास मोताद होणे.
- अन्नास लावणे = उदरनिर्वाहाचे साधन मिळवून देणे.
- अग्निदिव्य करणे.
- अंग धरणे = लठ्ठ होणे, बाळसेदार होणे.
- अटकेपार झेंडा लावणे.
- अर्धचंद्र असणे = अपुरा पडणे ,अपूर्ण .
- अडकित्त्यात सापडणे.
- अत्तराचे दिवे लावणे.
- अंगाची लाही होणे = रागाने बेफाम होणे.
- अंगावर मूठभर मांस चढणे.
- अंगाचा तिळपापड होणे. = खूप राग येणे.
- अंथरूण पाहून पाय पसरणे.
- अधीर होणे = उत्सुक होणे
- अभिमान वाटणे = गर्व वाटणे
- अत्तराचे दिवे जाळणे = मूर्खपणाने उधळपट्टी करणे
- अंगवळणी पडणे = सवयीचे होणे
- अवदसा आठवणे = वाईट बुद्धी सुचणे
- अंगात वीज भरणे = अचानक उत्साह वाटणे.
- अंगठा दाखवणे = नाकबूल करणे.
- अकलेचा खंदक = मूर्ख मनुष्य.
- अभिनंदनाचा पाऊस पडणे = सगळीकडून कौतुक होणे
मूळाक्षर आ
संपादन- आगपाखड करणे.
- आडवा हात मारणे
- आग लावणे
- आगीत तेल ओतणे = भांडण वाढेल असे करणे
- आग ओकणे
- आवळा देऊन कोहळा काढणार
- आवळा पिकायचा नाही समुद्र सुकायचा नाही
- आतल्या आत कुढणे
- आभाळाला कवेत घेणे
- आंदण देणे
- आयोजित करणे
- आखाडे बांधणे
- आंबून जाणे
- आवर्जून पाहणे
- आत्मसात करणे
- आड येणे
- आकांडतांडव करणे
- आकाश ठेंगणे होणे
- आकाश पाताळ एक करणे = नाहक आरडाओरडा करणे
- आकाश कोसळणे = मोठे संकट येणे
- आकाशाला गवसणी घालणे = महत्त्वाकांक्षा बाळगणे, शक्ती बाहेरची गोष्ट करून पाहणे
- आपल्या पोळीवर तूप ओढणे
- आभाळ फाटणे = सर्व बाजूंनी संकट येणे
- आनंदाचे भरते येणे = खूप आनंद होणे
- आनंदाला पारावार न उरणे = अतिशय आनंद होणे
- आनंद गगनात मावेनासा होणे = अत्यानंद होणे
- आयुष्य वेचणे = आयुष्य खर्ची घालणे
- आकाशाची कुराड होणे = सर्व बाजूंनी संकटे येणे
मूळाक्षर इ
संपादन- इरेला पेटणे.
- इतिश्री करणे = शेवट करणे
- इतिश्री = शेवट.
मूळाक्षर ई
संपादनमूळाक्षर उ
संपादन- उल्हसित होणे
- उचंबळून येणे
- उंटावरुन शेळ्या हाकणे = दुरूनच सूचना देणे
- उखळ पांढरे होणे = भरपूर फायदा होणे
- उडत्या घोड्यावर चढणे
- उडत्या पाखराची पिसे मोजणे
- उर भरून येणे
- उर फुटून मरने
- उरावर बसणे
- उताणे पडणे
- उसने बळ आणणे
- उच्छाद मांडणे
- उहापोह करणे
- उसंत मिळणे
- उपोषण करणे
- उत्पात करणे
- उदास होणे
- उराशी बाळगणे
- उलटी अंबारी हाती येणे
- उन्मळून पडणे
- उन्हाची लाही फुटणे
- उदक सोडणे
- उध्वस्त होणे
- उखाळ्या-पाखाळ्या काढणे
- उचलबांगडी करणे
- उजेड पाडणे = मोठे काम करणे
- उंटावरचा शहाणा = मूर्खपणाचा सल्ला देणारा
- उंबराचे फूल = क्वचित भेटणारी व्यक्ती
- उराउरी भेटणे = मिठी मारणे
मूळाक्षर ऊ
संपादन- ऊर भरून येणे = गदगदून येणे.
- ऊत येणे = अतिरेक होणे.
- ऊन खाली येणे = सायंकाळ होणे.
- ऊर बडवून घेणे = आक्रोश करणे.
मूळाक्षर ए
संपादन- एक घाव दोन तुकडे करणे.
- एरंडाचे गुऱ्हाळ = कंटाळवाणे भाषण देणे
एकाच काळातील
मूळाक्षर ऐ
संपादन- ऐट मिरवणे = तोरा मिरवणे
मूळाक्षर ओ
संपादन- ओक्साबोक्शी रडणे
- ओढा असणे
- ओढाताण होणे = त्रासदायक धावपळ होते.
- ओस पडणे = भकास होणे
- ओहोटी लागणे
- ओनामा = प्रारंभ
मूळाक्षर औ
संपादनऔत ओढणे
मूळाक्षर ऋ
संपादनTiger
मूळाक्षर क
संपादन- कुरघोडी करणे
- कस्पटासमान लेखणे
- कट शिजवणे
- कानाखाली आवाज काढणे
- काना मागून येऊन शाहणे होणे
- कानात जीव ओतणे
- कान टोचणे
- कान ओढणे
- कान लाल करणे
- कान धरणे
- कानातल्या कानात सांगणे
- कानोकानी सांगणे
- कुंपणाने शेत खाणे
- कंबर मोडणे
- कोंड्याचा मांडा करणे = काटकसर करणे
- कोंडमारा होणे = निरुपाय होणे
- कीस पाडणे
- काळीज उडणे
- कूच करणे
- कात्रीत सापडणे = संकटात सापडणे
- कच्छपी लागणे
- कुणकुण लागणे
- कणव असणे
- कटाक्ष असणे
- कापरे सुटणे
- कारवाया करणे
- कट करणे
- किरकिर करणे
- कस लावणे
- कसून मेहनत करणे
- कहर करणे
- कोडकौतुक होणे
- कंपित होणे
- कणिक तिंबणे = मार देणे
- कपाळ फुटणे =दुर्दैव ओढवणे
- कपाळमोक्ष होणे = कपाळ आपटून जखम होणे
- कान फुंकणे = चहाड्या करणे
- कागदी घोडे नाचवणे = फक्त लेखनात शूरपणा दाखवणे
- कानावर हात ठेवणे = नाकबूल करणे
- कानउघाडणी करणे = कडक शब्दात चूक समजून देणे
- कानाडोळा करणे
- काया पालटणे = स्थिती बदलणे
- काट्याने काटा काढणे
- काट्याचा नायटा होणे
- कावरा बावरा होणे
- काळजाचे पाणी पाणी होणे
- कुत्रा हाल न खाणे
- कंठस्नान घालणे = शिरच्छेद करणे
- कंठशोष करणे
- कंबर कसणे = जिद्दीने कामाला लागणे
- केसाने गळा कापणे
- कोंबडे झुंजवणे
- कोपरापासून हात जोडणे
- केसाची साल काढणे
- काळजात लख्ख होणे
- कळीचा नारद = भांडणे लावणारा
- काखा वर करणे = जवळ काही नसणे
- काणाडोळा करणे = लक्ष न देणे
- काकदृष्टीने पाहणे = बारकाईने न्याहाळणे
- कानावर पडणे = सहजपणे ऐकू येणे
- कळी खुलणे = आनंदित होणे
- कपाळी असणे = नशिबात असणे
- कच खाणे = माघार घेणे
- कांकूं करणे = मागेपुढे करणे
- काळीज कळवळणे = दया येणे
- कामी येणे = मृत्यू पावणे
- कंठात घेऊन येणे = गहिवरणे
- किंमत कळणे = महत्व समजणे
- कंबर खचणे = धीर सुटणे
- काढता पाय घेणे = निसटणे, निघून जाणे
- कानावर येणे = समजणे
- कानावर घालणे = सांगणे
- कान उपटणे = कडक शब्दांत समज देणे
- कानगोष्टी करणे = हळू आवाजात गप्पा गोष्टी करणे
- कोंडी फोडणे = मार्ग काढणे
- कान देणे = लक्षपूर्वक ऐकणे
- कान निवणे = ऐकून समाधान होणे
- कान किटणे = ऐकून कंटाळा येणे
- कंठ फुटणे = खणखणीत आवाजात बोलणे
- कंठ दाटून येणे = गहीवरून येणे
- कंठाशी प्राण येणे = अतिशय घाबरणे
- काटा काढणे = ठार मारणे
मूळाक्षर ख
संपादन- खडा टाकणे = काळजीपूर्वक सतत पहारा करणे
- खनकावणे
- खिसा कापणे
- खजिल होणे
- खायचे वांदे होणे
- खितपत पडणे
- खंड न पडणे
- खळखळ करणे
- खसखस पिकणे = मोठ्याने हसणे
- खूणगाठ बांधणे = निश्चय करणे
- खडे चारणे = पराभव करणे
- खडे फोडणे = दोष देणे
- खापर फोडणे = विनाकारण दोषी ठरवणे
- खाजवुन खरुज काढणे
- खाल्ल्याघरचे वासे मोजणे
- खो घालणे = कामात अडथळा आणणे
- खट्टू होणे = रुसणे
मूळाक्षर ग
संपादन- गहिवरून येणे
- गाजावाजा करणे
- गढून जाणे
- गट्टी जमणे
- ग्राह्य धरणे
- गुण्यागोविंदाने रहाणे
- गुमान काम करणे
- गर्भगळीत होणे
- गळ घालणे
- गळ्यात पडणे = इच्छेविरुद्ध लादणे
- गळ्याशी येणे
- गाडी पुन्हा रुळावर येणे
- गुजराण करणे = कसेबसे भागवणे
- गुण उधळणे/पाळणे = दुर्गुण दाखवणे
- गंगेत घोडे न्हाणे
- गळ्यात धोंड पडणे
- गाशा गुंडाळणे = निघून जाणे, सामानासह मुक्काम हलवणे
- गंध नसणे = माहीत नसणे
- गळा काढणे = मोठ्याने रडू लागणे
- गळी उतरणे = समजून देणे
- गळ्यात गळा घालणे = घनिष्ठ मैत्री असणे
- ग्वाही देणे = साक्ष देणे
- गंगा यमुना वाहणे = डोळ्यातून अश्रू वाहणे
- गडप होणे = लपणे, नाहीसे होणे
- गाठीला उरणे = शिल्लक राहणे
- गाळण उडणे = अतिशय घाबरणे
- गाठखर्च करणे = पैसे खर्च करणे
- गळ्यातला ताईत = अतिशय प्रिय वस्तू
मूळाक्षर घ
संपादन- घरकोंबडा होणे.
- घशाशी येणे.
- घोडा मैदान दूर नसणे.
- घाम गाळणे = खूप कष्ट करणे
- घरचा आहेर.
- घरोबा करणे.
- घोकंपट्टी करणे.
- घडी भरणे.
- घर डोक्यावर घेणे = घरात गोंधळ घालणे
- घर धुवून नेणे.
- घालून-पाडून बोलणे.
- घोडे मारणे = नुकसान करणे
- घोडे पुढे धामटणे.
- घोडे पेंड खाणे.
- घटका भरणे = शेवट जवळ येणे
- घागरगडाचा सुभेदार = पाणक्या
मूळाक्षर च
संपादन- चित्र बदलुन जाणे
- चिंता वाटणे
- चित्त विचलित होणे
- चाहूल लागणे
- चितपट करणे
- चिंता वाहणे
- चक्कर मारणे
- चेहरा खुलणे
- चतुर्भुज होणे = कैद होणे, लग्न होणे
- चार पैसे गाठीला बांधणे
- चुरमुरे खात बसणे = खजील होणे, पदरी न पडणे
- चारी दिशा मोकळ्या होणे
- चौदावे रत्न दाखवणे = मार देणे
- चौकशी करणे
- चंगळ होणे = भरपूर लाभ होणे
- चहा करणे = स्तुती करणे
- चेहरा काळवंडणे = मन खिन्न होणे
- चोरावर मोर बसणे = मात करणे, वरचढ होणे
मूळाक्षर छ
संपादन- छातीवर घेणे
- छाती ठोकणे
- छाप पडणे
- छातीत धस्स होणे
- छाननी करणे
- छत्तीसचा आकडा = वैर, विरोध
मूळाक्षर ज
संपादन- जमीनदोस्त करणे jivari thombne
- जळफळाट होणे
- जीव वरखाली होणे
- जीवाची मुंबई करणे
- जम बसणे
- जंग जंग पछाडणे
- जिभेला हाड नसणे = वाटेल ते बोलणे
- जिवात जीव येणे = प्राणपणाने मदत करणे
- जीव कासावीस होणे
- जीव भांड्यात पडणे
- जीव मुठीत धरणे = मन घट्ट करणे
- जीव मेटाकुटीस येणे
- जीव अधीर होणे
- जीव टांगणीला लागणे = चिंताग्रस्त होणे
- जीवावर उदार होणे
- जिवाचे रान करणे = खूप कष्ट करणे
- जीव खाली पडणे
- जिवाचा धडा करणे
- जीव की प्राण असणे
- जिवावर बेतणे = प्राण संकटात येणे
- जीवावर उड्या मारणे
- जीवाला घोर लागणे
- जीव गहाण ठेवणे
- जिव थोडा थोडा होणे
- जोपासना करणे
- जिवावर येणे = कंटाळा येणे
- जखमेवर मीठ चोळणे = उणिवेवर प्रहार करणे
- जिवाची उलघाल होणे = खूप भीती वाटणे
- जिवापाड जपणे = मायेने सांभाळणे
- जीभ सैल सोडणे = गरजेपेक्षा जास्त बोलणे
- जिभल्या चाटणे = खाणाऱ्याकडे फक्त पहात राहणे
- जीभ चावणे = संकोच धरून बोलणे
- जिभेवर नाचणे = तोंडपाठ असणे
- जोडे फाटणे = खेटे घालणे, नाहक ये-जा करणे
- जमदग्नी = अतिशय रागीट मनुष्य
मूळाक्षर झ
संपादन- झुंज देणे.
- झळ लागणे.
- झोकून देणे
- झीज सोसणे = नुकसान सहन करणे
- झिंग चढणे = धुंदी येणे
- झाकले माणिक = साधा पण गुणी मनुष्य
मूळाक्षर ट
संपादन- टरकवने
- टिकाव लागणे
- टक लावून पाहणे = बारीक नजरेने पाहणे
- टाहो फोडणे
- टाके ढीले होणे
- टेंभा मिरविणे = ऐट दाखवणे
- टाळाटाळ करणे = स्पष्टपणे नाही न म्हणणे
- टोमणे मारणे = टोचून बोलणे
- टकामका पाहणे = आश्चर्याने पाहणे
- टाळ्या झडणे = सतत टाळ्या वाजणे
- टंगळमंगळ करणे = कामाची चालढकल करणे
मूळाक्षर ठ
संपादन- ठसा उमटवने
- ठेंगा दाखवणे
- ठासून सांगणे
- ठणकावने
- ठणठणाट असणे
- ठोठावणे
- ठाण मांडणे
- ठेचणे
- ठणठणपाळ = द्रव्य व विद्या दोन्ही नसलेला
मूळाक्षर ड
संपादन- डरकाळी फोडणे
- डोंगर पोखरून उंदीर काढणे
- डोके खाजवणे = आठवण्याचा प्रयत्न करणे
- डोक्यावर घेणे
- डोक्यावर बसणे = योग्यतेपेक्षा अधिक महत्व देणे
- डोके लावणे
- डोकेदुखी होणे = त्रास होणे
- डोक्यावरून आपटणे
- डोके फोडणे
- डोके दाबणे
- डोके पिकवणे
- डोके खाणे
- डोके गरम करणे
- डोके शांत ठेवणे
- डोळा मारणे
- डोळे दाखवणे
- डोळे पांढरे करणे
- डोळे काढणे
- डोळे वटारणे
- डोळे मिटणे
- डोळ्यात तेल घालून पाहणे
- डोळा लागणे = झोप लागणे
- डोळ्याला डोळा नसणे
- डोळ्यात भरणे = आवडणे
- डोळ्यातून उतरणे
- डोळ्यात अंजन घालणे = स्पष्टपणे चूक दाखविणे
- डोळा चुकवणे
- डोळे लाऊन बसणे
- डोळे भरून येणे = वाईट वाटणे
- डोळ्याला डोळा न भिडवणे
- डोळे फिरणे
- डाव येणे
- डाव साधणे
- डाळ शिजणे
- डांगोरा पिटणे = जाहीर करणे
- डोक्यावर मिरी वाटणे
- डोक्यावर खापर फोडणे
- डोळ्यात धूळ फेकणे
- डोळ्यांवर कातडे ओढणे
- डोळे निवणे
- डोळ्यांत खुपणे
- डोळ्यांचे पारणे फिटणे = समाधान होणे
- डोळे खिळून राहणे
- डोळे दिपणे
- डोळ्यात प्राण आणणे
- डोळे फाडून पहाणे
- डोळे भरून पहाणे
- डोळे उघडणे = पश्चाताप होणे, शहाणपण येणे
- डोळ्यात सलणे = मत्सर वाटणे, द्वेष करणे
- डोक्यात राख घालणे = अविचाराने वागणे
- डोके वर काढणे = पुना उद्भवणे
- डोके चालवणे = युक्ती शोधणे
- डोईजड होणे = वरचढ होणे
- डोळ्याला डोळा लागणे = झोप न लागणे
- डोळे खिळवणे = मन आकर्षित होणे
मूळाक्षर ढ
संपादन- ढगभरून येणे
- ढोर कष्ट करणे = खूप मेहनत करणे
- ढुंकून न पाहणे = जराही न पाहणे
मूळाक्षर ण
संपादनमूळाक्षर त
संपादन- तलावारिला पाणी देणे
- तळ्यात मळ्यात करणे.
- तोंडाला काळे फासणे
- तोंड लपवणे
- तोंडाला पाणी सुटणे = लोभ होणे
- तोंडी लागणे
- तोंडचे पाणी पळणे = धीर सुटणे
- तोंडो तोंडी येणे
- तोंडावर येणे = फार जवळ येणे
- तोंडघाशी पडणे
- तोंड फुटणे
- तजवीज करणे
- तगादा लावणे
- तोंड भरून बोलणे
- ताटकळत उभे राहणे
- तारांबळ होणे
- तोंड देणे = प्रतिकार करणे
- तगून राहणे
- तोंडून अक्षर न फुटणे
- तोंडी लावणे
- ताट वाढणे
- तडीस नेणे
- ताळ्यावर आणणे
- तळपायाची आग मस्तकात जाणे
- तिलांजली देणे = त्याग करणे
- तोंड काळे करणे = निघून जाणे
- तोंडाला पाने पुसणे
- तळहातावर शीर घेणे = मृत्यूची पर्वा न करणे
- तळहाताचा फोड = अतिशय काळजी ने केलेली जपणूक
- ताटाखालचे मांजर होणे = अंकित होऊन राहणे
- तोंडात बोट घालणे = नवल वाटणे, आश्चर्यचकित होणे
- तोंड ढाकणे
- तोंडावाटे ब्र न काढणे
- तारे फोडणे = वेड्यासारखे बोलणे
- तोंड टाकणे = अद्वातद्वा बोलणे/बरळणे
- तोंड घालणे = मधे मधे बोलणे
- तोंड सांभाळणे = जपून बोलणे
- तोंडसुख घेणे = वाटेल तसे बोलणे
- तोंडाला कुलूप लावणे = एकदम गप्प होणे
- तोंडाची वाफ दवडणे = निरर्थक बडबडणे
- त्राटिका = कजाग बायको
- त्रेधा उडणे = फजिती होणे
मूळाक्षर थ
संपादन- थवे चारणे
- थारा न देणे
- थांग न लागणे
- थुंकी झेलणे = खुशामतीची सीमा गाठणे
- थंडा फराळ करणे = उपाशी राहणे
- थोबाड रंगविणे = थोबाडीत मारणे
मूळाक्षर द
संपादन- दगडावरची रेघ = खोटे न ठरणारे शब्द
- दातओठ खाणे = चरफडणे
- दोनाचे चार हात करणे = लग्न करणे
- दात दाखवणे
- दात पाडणे
- दात खाणे
- दाणादाण करणे
- देणे - घेणे नसणे
- दातखिळी बसणे
- दक्षता घेणे
- दप्तरी दाखल होणे
- देखरेख करणे
- देहातून प्राण जाणे
- दिवस बुडून जाणे
- दडी मारणे
- देखभाल करणे
- दिशा फुटेल तिकडे पळणे
- दुमदुमून जाणे
- दगा देणे
- दबा धरून बसणे
- दाद मागणे
- दात धरणे
- दाढी धरणे
- दातांच्या कण्या करणे
- दाती तृण धरणे
- दत्त म्हणून उभे राहणे
- द्राविडी प्राणायाम करणे
- दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे
- दातास दात लावून बसणे
- दुःखावर डागण्या देणे
- दिवस पालटणे = चांगले दिवस येणे
- दुधात साखर पडणे = काम अधिक चांगले होणे
- दारात हत्ती झुलणे = वैभवाचा कळस होणे
- दिवस कंठणे = कसेबसे जीवन जगणे
- दाद देणे = मन व्यक्त करणे/ प्रशंसा
- दीड शहाणा = मूर्ख
- दोन हात करणे = मारामारी करणे
मूळाक्षर ध
संपादन- धचा मा करणे
- धूळ चारणे = पूर्ण पराभव करणे
- धर्म करता कर्म उभे राहणे.
- धीर चेपणे.
- धन करणे.
- धाक असणे
- धुडगूस घालणे
- धन्य होणे
- धारातीर्थी पडणे
- धाबे दणाणणे = घाबरणे, खूप भीती वाटणे
- धूम ठोकणे = पळून जाणे
- धूळभेट = उभ्या उभ्या झालेली भेट
- धडगत नसणे = जगण्याची आशा न उरणे
- धडाका लावणे = सतत करणे
- धुळीस मिळणे = नाश पावणे
मूळाक्षर न
संपादन- नाकाने कांदे सोलणे = शहाणपणा मिरवणे
- नाकातलं काढून ओठावर ठेवणे
- नाक मुरडणे = नापसंती दाखवणे
- नाक कापणे = अपमानित करणे
- नाकात दम आणणे = त्रास होणे.
- नका समोर चालणे = सरळमार्गी असणे
- नाक नसणे = तोंड दाखवायला जागा नसणे
- नाकी नऊ येणे = बेजार होणे, त्रासून जाणे
- नाक खुपसणे = नको तिथे लक्ष घाल ले
- नाक दाबणे = जेरीस आणणे
- नाक वर असणे = तोरा मिरवणे
- नाकावर पाडणे = अपमानित होणे
- नाडी पकडणे = अचुक अंदाज वर्तवणे
- नाट लागणे
- नव्याचे नऊ दिवस
- निष्प्रभ करणे
- नसती बिलामत येणे
- नाक मुठीत धरणे
- नूर पातळ होणे
- निक्षून सांगणे
- नजर वाकडी करणे
- नाळ तोडणे
- निद्राधीन होणे = गाढ झोप येणे
- नाव कमावणे = सन्मान होणे
- निवास करणे = राहाणे
- नजरेत भरणे = आवडणे
- नाक घासणे = क्षमा मागणे
- नाक ठेचणे = शिक्षा करणे
- नाकावर राग असणे = चटकन राग येणे
- नाकाला मिरच्या झोंबणे = रागावणे
- नांगी टाकणे = घाबरून जाणे
- नक्राश्रू ढाळण
- नक्शा उतरवणे
- नाकाशी सूत धरणे
- निगा राखणे = काळजी घेणे
- नाक घासणे = शरण येणे
- नाव काढणे = कीर्ती मिळणे
- न भूतो न भविष्यती होणे = पूर्वी न झालेली व पुढे न होणारी गोष्ट घडणे
मूळाक्षर प
संपादन- पहिले पाढे पंचावन्न
- पळता भुई थोडी होणे
- पाचवीला पुजलेले असणे
- पाणी पाजणे = पराभव करणे
- पाणी मुरणे = दोषाला जागा असणे
- पाण्यात पाहणे = द्वेष करणे
- पाने पुसणे
- पासंगाला न पुरणे
- पोटात दुखणे = मत्सर करणे
- प्राण पणाला लावणे
- प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणे
- प्रतिबंध करणे
- पुनरुज्जीवन करणे
- पिंक टाकणे
- पाळत ठेवणे
- प्लान करने
- पुढाकार घेणे
- पहारा देणे
- प्रघात पडणे
- पार पाडणे
- परिपाठ असणे
- प्रतिष्ठापीत करणे
- प्रचारात आणणे
- प्राणाला मुकणे
- पदरी घेणे
- प्रक्षेपित करणे
- प्रतिकार करणे
- पाळी येणे
- प्रत्यय येणे
- प्रतिष्ठा लाभणे
- पाठिंबा देणे
- प्राप्त करणे
- प्रस्ताव ठेवणे
- पाहुणचार करणे
- प्रेरणा मिळणे
- पाठीशी घालणे = संरक्षण देणे
- पाणी पडणे = फुकट जाणे, उत्साहभंग होणे
- पाणी सोडणे = त्याग करणे
- पदरात घालणे = स्वाधीन करणे
- पाठ न सोडणे
- पाढा वाचणे
- पादाक्रांत करणे
- पराचा कावळा करणे
- पाऊल वाकडे पडणे
- पायाखाली घालन
- पुंडाई करणे
- पाठ दाखवणे = समोरून पळून जाणे
- पायमल्ली करणे = धुडकावणे
- पोटात कावळे काव काव करणे = फार भूक लागणे
- पोटात घालणे = क्षमा करणे
- पोटात शिरणे = विश्वास संपादन करणे
- पोटावर पाय देणे = कमाई बंद ठेवणे
- पोटाची दमडी वळणे
- पदरमोड करणे
- पोटाला चिमटा घेणे = अर्धपोटी राहणे
- पड खाणे = माघार घेणे
- पाय धरणे = शरण जाणे
- पाया घालणे = प्रारंभ करणे
- पायपीट करणे = खूप भटकणे
- पारा चढणे = खूप रागावणे
- पाय घसरणे = चुकीच्या मार्गाला लागणे
- पाठ थोपटणे = शाबासकी देणे
- पाणउतारा करणे = अपमान करणे
- पाठ फिरवणे = पाहून दुर्लक्ष करणे
- पाठीस लागणे = पुन्हा पुन्हा त्रास देणे
- पोटात ठेवणे = गुप्त ठेवणे
- पोटाची धरणे = मायेने जवळ धरणे
- पांघरून घालणे = दोष झाकणे
- पोटात धस्स होणे = अतिशय भीती वाटणे
- पांढर्यावर काळे करणे = लिहिणे
- पालथ्या घागरीवर पाणी = निष्फळ श्रम
- पोटात गोळा घेणे = अतिशय भीती वाटणे
- पोबारा करणे = पळून जाणे
- पोट पाठीला टेकणे = उपाशी असणे
- पोट धरून हसणे = खूप हसणे
- पाठपुरावा करणे = पिच्छा पुरवणे
- पराचा कावळा करणे = शिल्लक गोष्ट वाढवून सांगणे
- पायदळी तुडविणे = तुच्छ लेखणे
- पाय पसरणे = व्याप्ती वाढवणे
- पायबंद घालणे = बंधन घालणे
- पाय मोकळे करणे = फिरायला जाणे
- पाचावर धारण बसणे = भयभीत होणे
- प्रकृती खालावणे = तब्येत खराब होणे
- प्राणास मुकणे = मरणे
- प्राणाचे बलिदान देणे = हसतमुखाने मृत्यू पत्कारणे
- पारडे फिरणे = परिस्थिती एकदम पालटणे
मूळाक्षर फ
संपादन- फूस लावणे
- फंदात न पडणे
- फिदा होणे
- फैलावर घेणे
- फडशा पाडणे = संपविणे
- फितूर होणे = शत्रूला सामील होणे
मूळाक्षर ब
संपादन- बाऊ करणे
- बादरायण संबंध जोडणे
- ब्र (न) उच्चारणे
- बस्तान ठोकणे
- बळ लावणे
- बारा गावचे पाणी पिणे
- बांधणी करणे
- बडेजाव वाढवणे
- बाहू स्फुरण पावणे
- बेत करणे /बेत आखणे
- बत्तर बाळ्या होणे
- बहिष्कार टाकणेे
- बेतात असणे
- ब्रम्हांड आठवणे = भीती वाटणे
- बेजार होणे = हैरान होणे
- बोल लावणे = दोष देणे
- बुचकळ्यात पडणे = गोंधळणे
- बांगडी फुटणे = वैधव्य येणे
- बोटे मोडणे = तिरस्कार करणे, व्यर्थ चरफडणे
- बिनभाड्याचे घर = तुरुंग
- बोबडी वळणे = घाबरून बोलता न येणे
- बोटावर खेळविणे = आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे
मूळाक्षर भ
संपादन- भाव खाणे.
- भान हरपणे.
- भंडावून सोडणे = त्रासून सोडणे
- भाऊबंदकी असणे.
- भानावर येणे
- भर असणे
- भरभराट असणे
- भान ठेवणे
- भरारी मारणे
- भडभडून येणे
- भगीरथ प्रयत्न करणे
- भान नसणे
- भारून टाकणे
- भाव वधारणे = महत्व वाढणे
- भाग पडणे = करायला लावणे
- भागुबाई = भित्रा माणूस
- भ्रमाचा भोपळा फुटणे = अपेक्षाभंग होणे
- भ्रमंती करणे = भटकंती करणे , फिरणे
मूळाक्षर म
संपादन- मन भरून येणे
- माशी शिंकणे = कामात अडथळा येणे
- मूग गिळून गप्प बसणे
- मोर पिस फरवलया सारखे वाटणे
- मनोरथ पूर्ण होणे
- मिनतवारी करणे
- मिशांना तूप लावणे
- मत्सर वाटणे
- मती गुंग होणे
- मोहाला बळी पडणेयय
- मनावर बिंबवणे
- मात करणे
- मान्यता पावणे
- मागमूस नसणे
- मनात मांडे खाणे = मनोराज्य करणे
- माशा मारणे = निरुद्योगी असणे
- मिशीवर ताव मारणे
- मधून विस्तव न जाणे
- मधाचे बोट लावणे
- मनात घर करणे
- मन मोकळे करणे
- मनाने घेणे
- मन सांशक होणे
- मनावर ठसणे
- मशागत करणे
- मात्राचालणे
- मंत्रमुक्त होणे
- मुभा असणे = मोकळीक असणे
- मन जिंकणे = आपलेसे करणे
- मुलाहिजा बाळगणे = पर्वा करणे
- मन मोहरणे = मनाला आनंद देणे
- मेतकूट जमणे = दृढ मैत्री जमणे
- मूग गिळून बसणे = गप्प बसणे
- मुठीत असणे = ताब्यात असणे
- माशा मारीत बसणे = रिकामे बसणे
- मुसंडी मारणे = वेगाने पुढे जाणे
मूळाक्षर य
संपादन- ह्या करणे = यक्षप्रश्न असणे युक्ती सफल होणे
मूळाक्षर र
संपादन- रवाना होणे.
- रस असणे.
- राबता असणे = सतत ये-जा असणे
- रियाज करणे.
- रुची निर्माण होणे.
- राम नसणे = अर्थहीन असणे
- राम राम ठोकणे = निरोप देणे
- रात्रीचा दिवस करणे = रात्रंदिवस कष्ट करणे
- रक्ताचे पाणी करणे.
- राईचा पर्वत करणे.
- राख होणे.
- राब राब राबणे.
- राम म्हणणे = मृत्यू येणे
- रक्त आठवणे.
- रंग दिसणे = संभव दिसणे
- रग लागणे = खूप दुखणे
- रसातळाला जाणे = अधोगती होणे, नाश होणे
- रेलचेल असणे = भरपूर असणे
- रक्ताचे पाणी करणे = अतिशय परिश्रम करणे
मूळाक्षर ल
संपादन- लष्कराच्या भाकऱ्या भाजणे.
- लंकेची पार्वती होणे = अंगावर एकही दागिने नसणे
- लष्टक लावणे
- लवलेश नसणे
- लळा लागणे
- ललकारी देणे
- लढा देणे
- लांछनास्पद असणे
- लहान तोंडी मोठा घास घेणे
- लक्ष वेधून घेणे
- लक्ष्मीचा वरदहस्त असणे
- लौकिक मिळवणे
मूळाक्षर व
संपादन- विचार पुस करणे.
- वड्याचे तेल वांग्यावर काढणे.
- वाटाण्याच्या अक्षता लावणे.
- वेड पांघरुन पेडगावला जाणे.
- वारी करणे.
- वर्दी देणे
- वेसण घालणे
- विदीर्ण होणे
- वाचा बंद होणे
- वंचीत राहणे
- वारसा देणे
- विरस होणे
- वाऱ्यावर सोडणे = दुर्लक्ष करणे
- वणवण करणे
- वजन पडणे
- व्रत घेणे
- विसावा घेणे
- वरदान देणे
- विरोध दर्शवणे
- वाट तुडवणे
- विहरणे
- वकील पत्र घेणे
- वाट लावणे = नाश करणे
- विल्हेवाट लावणे
- वाटाण्याच्या अक्षता लावणे
- वठणीवर आणणे
- वाचा बसणे
- विचलित होणे
- विसंवाद असणे
- विडा उचलणे = प्रतिज्ञा करणे
- वर्ज्य करणे = टाळणे
- वाळीत टाकणे = संबंध तोडणे
- वाकडे पाऊल पडणे = दुर्वर्तन करणे
- विरजण पडणे = निरुत्साही होणे
- वीरश्री चढणे = उत्साह संचारणे
- वाखाणणी करणे = स्तुती करणे
- वेठीस धरणे = अडवून ठेवणे, बांधून ठेवणे
- विळखा घालणे
मूळाक्षर श
संपादन- शाळा होणे.
- शाळा घेणे.
- शक्कल लढवणे.
- शब्द जमिनीवर पडू न देणे.
- शहानिशा करणे = खात्री करणे.
- शिगेला पोचणे.
- शंभर वर्ष भरणे.
- श्रीगणेशा करणे.
- शिकरत करणे.
- शेणसडा होणे = परिस्थिती वाईट होणे, वाया जाणे.
- शिरकाव करणे = आत घुसणे
मूळाक्षर ष
संपादन- षट्कर्णी होणे = गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे
मुळाक्षर स
संपादन- स्वार होणे
- स्वर्ग दोन बोटे उरणे
- सुताने स्वर्गाला जाणे = तर्क करीत बसणे
- सुंठीवाचून खोकला जाणे
- सलगी आसने
- संगोपन करने
- सरड्याची धाव कुंपणापर्यंत
- सुचेनासे होणे
- सर्वस्व पणाला लावणे
- सही ठोकणे
- सख्य नसणे
- संभ्रमित होणे
- सांजावणे
- साशंक असणे
- समजूत काढणे
- सूड घेणे
- सपाटा लावणे
- सहभागी होणे
- समरस होणे
- सारसरंजाम असणे
- स्तंभित होणे
- सुळकांडी मारणे
- सांगड घालणे
- सहीसलामत सुटणे
- समाचार घेणे = खोड मोडणे
- सद्गदित होणे = गहिवरूणे
- साखर पेरणे = गोड गोड बोलणे
- सळो की पळो करणे = त्रास देणे
- सार्थकी लागणे = योग्य उपयोग होणे
- सव्यापसव्य करणे = यातायात करणे
- सोने होणे = चांगले होणे
- सारवासारव करणे = नीटनेटके करणे/ संपादणे
- सर करणे = जिंकणे
- सूतोवाच करणे = प्रारंभ करणे
- सर न येणे = बरोबरी न होणे
- सूंबाल्या करणे = पळून जाणे
- सिद्ध होणे = तयार होणे
मूळाक्षर ह
संपादन- हळहळ होणे.
- हिरवा कंदील दाखवणे.
- हात देणे.
- हात दाखवणे = मात देणे, फसविणे
- हात टेकणे = नाईलाज होणे, निरुपाय होणे
- हात पसरणे
- हात हलवत परतणे = काम न होणे
- हात लावणे.
- हात हातात घेणे.
- हाती लागणे.
- हपापा चा माल गपापा करणे
- हात मिळवणे
- हात साफ करणे.
- हात मारणे
- हात घालणे
- हात असणे
- हाती येणे
- हाती घेणे
- हुडहुडी भरणे
- हातभार लावणे
- हंबरडा फोडणे = अनावर शोक करणे
- हशा पिकणे
- हौस भागवणे
- हवालदील होणे
- हस्तगत करणे = ताबा मिळविणे
- हरबऱ्याच्या झाडावर चढविणे = गीता स्तुती करणे
- हरताळ फासणे = नाश पावणे/ निफल करणे
- हाडाची काडे करणे = अति कष्ट करणे
- हतबल होणे = असमर्थ ठरणे
- हातखंडा असणे = तरबेज असणे
- हळद लावणे = विवाह होणे
- हात चोळणे = मनात चरफडणे
- हात जोडणे = नतमस्तक होणे
- हस्तक्षेप करणे = ढवळाढवळ करणे
- हात ओला करणे = पैसे किंवा भोजन मिळणे
- हात दाबणे = लाच देणे
- हातपाय गाळणे = निराश होणे, धीर सोडणे
- हायसे वाटणे = सुटकेचे समाधान होणे
- हातखंडा असणे = कुशलता असणे
- हातचा मळ = सहज घडणारी गोष्ट
- हात धरणे = वरचढ ठरणे
- हार जाणे = पराभव मान्य करणे
- हशा उसळणे = जोरजोरात हसणे
- हातावर तुरी देणे = फसवून जाणे
- हातातोंडाशी गाठ पडणे = जेमतेम खाण्यास मिळणे
- हेळसांड करणे = दुर्लक्ष करणे
- हीव भरणे = घाबरून अंग थरथरणे
मूळाक्षर क्ष
संपादन- क्षीण होणे