सम्राट अशोक

भारताचा तिसरा मौर्य सम्राट

सम्राट अशोक ( इ.स.पू. ३०४ - मृत्यू इ.स.पू. २३२) हे मौर्य घराण्यातील महान व चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. हा भारतीय समाजातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्याने भारतीय महाद्वीपावर राज्य केले होते. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. अनेकांच्या मतानुसार, सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान सम्राटांमध्ये पहिल्या श्रेणीतील होते.

सम्राट अशोक यांचे विचार

संपादन

सम्राट अशोक यांच्याबद्दल विचार

संपादन
  • ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाच्या बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकाने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरात बाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’

माधव कोंडविलकर (ग्रंथ - ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’)

  • भारताच्या इतिहासात एकच असा 'एकमेव' म्हणण्यासारखा कालखंड आहे, जो स्वातंत्र्याचा काळ, अतिशय महत्त्वाचा काळ आणि वैभवाचा काळ म्हणता येईल आणि तो काळ म्हणजे मौर्य सम्राट अशोकांच्या राज्यकारभाराचा काळ होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर (ग्रंथ - ॲनिहिलेशन ऑफ कास्ट)

  • “जगाच्या इतिहासात असे हजारो राजे आणि सम्राट होऊन गेले जे स्वतःला ‘हिज हायनेस’, ‘हिज मॅजेस्टीज’, ‘हिज एक्झॉल्टेड मॅजेस्टीज’ आणि अशा त्यांचे उच्चपद दर्शवणाऱ्या इतर अनेक पदव्या लावून घेत असत. हे सगळेजण काही काळापुरते प्रसिद्ध झाले आणि मग झटकन विस्मृतीतही गेले; पण सम्राट अशोक! ते मात्र एखाद्या तेजस्वी ताऱ्यासारखे सतत तळपतच राहिले आहे, अगदी आजपर्यंत.”

— एच्.जी. वेल्स (ग्रंथ - आऊलटाईट ऑफ हिस्टरी)

  • “इतिहासातल्या पानापानांवर हजारो राजांच्या नावांची अक्षरशः गर्दी झाली आहे; पण त्या गर्दीमध्येही सम्राट अशोकांचे नाव झळकत असलेले दिसते. खरं तर त्यांचे एकट्याचेच नाव एखाद्या ताऱ्यासारखे चमकते आहे.”

— ब्रिटीश इतिहासतज्ज्ञ एच्.जी. वेल्स

  • “आजपर्यंत होऊन गेलेले सम्राट आणि इतर प्रभावशाली व्यक्तींमध्ये सम्राट अशोक हे नक्कीच असे एकमेव सम्राट होते, ज्यांनी युद्ध जिंकल्यानंतर असा निश्चय केला होता की, भविष्यात एकाही शत्रूशी परत युद्ध करायचे नाही.”

— जवाहरलाल नेहरू (ग्रंथ- द डिस्कव्हरी ऑफ इंडिया)

  • “सम्राट अशोक हे इतिहासातील असे एक महान बादशाह होते, ज्यांची सत्ता अफगाणिस्तानपासून मद्रासपर्यंत अशी प्रचंड मोठी होती आणि तरीही ते असे वेगळेच बादशहा होते, जे उत्तम लढवय्ये असूनही, ज्यांनी कलिंग देशावर विजय मिळवल्यानंतर, युद्ध करणं पूर्णपणे बंदच करून टाकलं होतं. ख्रिस्तपूर्व २५५ मध्ये, मद्रासच्या पूर्व किनाऱ्यावर असणाऱ्या कलिंग देशावर त्यांनी आक्रमण केले, तेव्हा भारतीय द्वीपकल्पाचा अगदी शेवटच्या टोकापर्यंतचा सगळा भाग जिंकून घ्यायचा, हाच कदाचित त्यांचा हेतू होता. ही त्यांची मोहिम फत्ते झाली; पण त्या युद्धातील क्रुरपणा आणि भयानकपणा पाहून अशोकांच्या मनात युद्धाबद्दल आत्यंतिक तिरस्कार, कमालीचा तिटकारा निर्माण झाला. अजूनही उपलब्ध असलेल्या त्यांच्या काही शिलालेखांवरून असे दिसते की, त्या युद्धानंतर त्यांनी असे जाहीरच करून टाकले की, त्यापुढे ते कधीही युद्ध करून इतरांवर विजय मिळवणार नाही, तर धम्माच्या मार्गाने जाऊन इतरांची मने जिंकून घेईल आणि खरोखरच तिथून पुढचं सगळं आयुष्य त्यांनी बौद्ध धर्माचा जगभर प्रसार करण्यातच व्यतीत केलं. त्यानंतर त्यांच्या अवाढव्य साम्राज्यावर त्यांनी अतिशय शांततेने आणि कर्तृत्व पणाला लावून राज्य केले. तरी ते नुसचेच धर्मवेडे नव्हते. लोकांच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोक अठ्ठावीस वर्षे अगदी मनापासून आणि समजूतदारपणे झटले. इतिहासाच्या पानांपानावर ज्यांच्या नावांची अक्षरशः गर्दी झाली आहे, ज्यांच्या वैभवाची, ऐश्वर्याची, दयाळूपणाची प्रसन्न व्यक्तिमत्त्वांची, त्यांच्या राजेशाही बिरूदांची आणि अनेक गोष्टींची रकाने भरभरून माहिती दिलेली आहे, अशा हजारों राजांमधल्या निवडक दहा राजांमध्येसुद्धा सम्राट अशोकाचं नाव तळपळतच राहिलं आहे, बहुधा त्यांचं एकट्याचंच नाव एखाद्या तेजःपुंज लक्षवेधी ताऱ्यासारखं चमकत राहिलं आहे. व्होल्यापासून थेट जपानपर्यंत अजूनही त्यांचं नाव आदराने घेतले जातं. चीन, तिबेट आणि अगदी भारतातसुद्धा अजूनही त्यांचे महत्त्व मानले जाते. आत्ता हयात असणाऱ्या बऱ्याच लोकांनी, कॉन्स्टेंटाईन किंवा चार्लेमॅन यांची नावेही कदाचित ऐकली नसतील; पण सम्राट अशोकांच्या आठवणी मात्र त्यांच्या मनात अजूनही आहेत.”

— एच्. जी. वेल्स (ग्रंथ - ‘द आऊटलाईन ऑफ हिस्टरी’)

  • “अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की, एखाद्या देशातले सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील, तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल ? अशा काल्पनिक प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे; पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, एका सम्राटाने, ‘अहिंसा आणि अनुकंपा’ या तत्त्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक – शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम–जबरदस्ती करून, स्वतःच्या ऐषारामासाठी सुख-समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वतःचा डामडौल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वतःच्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वतःच्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी, आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांनाच, सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल.”

— दुली चंद्र जैन आणि सुनीता जैन (ग्रंथ- ‘अशोका एम्परर ऑर मॉन्क’)

  • “सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले, ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता. स्वतःचं उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती, संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाळ निर्माण करून दाखवला.”

— डॉ. कीर्तीसिंघे