"मोक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान " ==श्रीमद्‌भगवद्‌गीता== ===श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञा..."
(काही फरक नाही)

०७:११, १५ जून २०१७ नुसारची आवृत्ती



श्रीमद्‌भगवद्‌गीता

=श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग) ४.१६

मूळ श्लोक

   किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
   तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥

अर्थ

कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥