श्रीनिवास हेमाडे

१३ सप्टेंबर २०१५ पासूनचा सदस्य
विभाग जोडला : चिन्तातूर जन्तु
(नवीन सदस्य पान)
 
(विभाग जोडला : चिन्तातूर जन्तु)
 
 
तत्त्वज्ञान, धर्म, स्त्रीवाद, सौंदर्यशास्त्र, दलित अध्ययन, उच्चशिक्षण, माध्यमे, पत्रकारिता, नाटक, सिनेमा आणि इतर काही.
 
==[http://ramganeshgadkari.com/egadlari/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=233&Itemid=368 चिन्तातूर जन्तु]==
 
''निजलें जग; कां आतां इतक्या तारा खिळल्या गगनाला ।
काय म्हणावें त्या देवाला ? --'' '' वर जाउनि म्हण जा त्याला.'' ॥1॥
 
'' तेज रवीचें फुकट सांडते उजाड माळावर उघडया ।
उधळणूक ती बघवत नाही --'' ''डोळे फोडुनि घेच गडया'' ॥2॥
 
''हिरवी पानें उगाच केली झाडांवर इतकीं कां ही ।
मातिंत त्यांचे काय होतसें? --'' '' मातिस मिळुनी जा पाही !'' ॥3॥
 
''पुराबरोबर फुकटावारी पाणी हें वाहुनि जात ।
काय करावें जीव तळमळे --'' '' उडी टाक त्या पूरांत'' ॥4॥
 
''ही जीवांची इतकी गरदी जगांत आहे का रास्त ।
भरत मूर्खांचीच होत ना ?'' ''एक तूंच होसी जास्त'' ॥ 5॥
 
देवा, तो विश्वसंसार राहूं द्या राहिला तरी ।
या चिन्तातुर जन्तूंना एकदां मुक्ति द्या परी ॥ 6॥
 
गोविंदाग्रज - [[राम गणेश गडकरी]]
०९-११-१९०७ पुणे.
 
प्रताधिकार मुक्त