"पु.ल. देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २:
 
== स्रोतांतून ==
===गणगोत===
* जगण्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट मिळावी लागते; ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन.
** "गणगोत" (इ.स. १९६६)
 
* इतिहास हा आम्ही कागदपत्रांइतक्याच वयाने आणि त्याहूनही मनाने जीर्ण लोकांच्यावर सोपवलेला विषय समजतो. रुमालात बांधून ठेवायचा, वर्गातही विद्यार्थ्यांच्या अंगी तो न लागता घोकंपट्टीत घुसवायचा.
** "गणगोत" (इ.स. १९६६)
 
* पेढा करण्याचे कसब असण्यापेक्षा हलवायाची मैतरकी अधिक गोडीची.
** "गणगोत" (इ.स. १९६६)
 
* मोठ्या लोकांच्या लहानपणीच्या आवडी ह्या मोठेपण लाभल्यानंतरच सोयिस्कर रीतीने रचल्या जातात.
** "गणगोत" (इ.स. १९६६)
 
== अन्य स्रोतांतून ==
* शेवटी काय हो, आपण पत्त्याच्या नावाचे धनी, मजकुराचा मालक निराळाच.
 
* जगात काय बोलत आहात ह्यापेक्षा कोण बोलत आहात ह्याला जास्त महत्त्व आहे.
** "असा मी असामी" (इ.स. १९६४)
 
* प्रयास हा प्रतिभेचा प्राणवायू आहे.
** "व्यक्ती आणि वल्ली" (इ.स. १९६६) या पुस्तकातील ''सखाराम गटणे'' या व्यक्तिचित्रणातल्या 'सखाराम गटणे' या काल्पनिक व्यक्तीच्या तोंडचे अवतरण.
 
* लग्नापुर्वी शी न लूक्ड सो ... लुकडी!
** "मी आणि माझा शत्रुपक्ष" (इ.स. १९६८)
 
* मी लंडन मध्ये हमाली करून वजनी पाउंड घटवून चलनी पाउंड कमवावेत, असही सुचवण्यात आलं.
** "अपूर्वाई" (इ.स. १९६०)
 
== बाह्य दुवे ==