"अभिव्यक्तिस्वातंत्र्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १९:
*संस्कृतीरक्षणाच्या आवरणाखाली कित्येकांचे भोळेपणाने तर काहींचे धूर्तपणाने जळमटे आणि कोळिष्टकांचे जाळे विणण्याचे कार्यच चालू राहते. जगभराच्या इतिहासात सर्वच हुकूमशहांनी संस्कृतीरक्षणाच्याच नावाखाली देशांचा, संस्थांचा, प्रसारमाध्यमाचा आणि शिक्षणपद्धतींचा ताबा घेतला. त्यांतील साऱ्यांचे सर्वकाळ हेतू वैयक्तिक स्वार्थाचेच होते असे राजरोसपणे म्हणता येणार नाही. या हुकूमशहांच्या, त्यांना ताकद देणाऱ्या वाद, विचारप्रणाली किंवा धर्माधारांची आपल्या समाजाचे याने भलेच होणार आहे अशीच धारणा होती. हेतू काहीही असला तरी या सांस्कृतिक रखवालदारीने समाज मागे फेकला गेला; प्रगतीची दारे बंद झाली; विचारांचे आदानप्रदान थंडावले असाच इतिहास आहे. अगदी हुकूमशहा, देश, इतक्या मोठ्या पातळीवर जाण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूसही उद्योग, सामाजिक वा शासकीय अश्या ज्या संस्था मोडकळीस येतात त्यांमध्ये "विचार स्वातंत्र्यास बंधन" हेच सामायिक कारण असावे असा अंदाज आहे.........
 
:...........भाषा स्वातंत्र्यामुळे सभ्यतेवर होणारा तथाकथित घाला/ परंपरांना नागवेपणाने दिली जाणारी आव्हाने यांनी समाजाची घडी विस्कटणारही असेल. पण हे अप्रिय -- कदाचित पूर्णपणे अयोग्य -- असे विचार कोणाच्यातरी मनांत खदखदत आहेतच. मग ते वेळीच सामोरे येण्यातच सर्वांचे भले आहे. ही तळमळ, भडभड विद्रोही व्यासपीठावर मांडली जाऊन वेगळ्या पद्धतीची जातीयता निर्माण होण्यापेक्षा सर्वमान्य अशाच व्यासपीठावरची शांतता भंग पावली तर एकवेळ चालेल.हे हलाहल पचविण्यास सर्वसामान्य माणूस नक्कीच समर्थ आहे. त्याची चिंता विद्वत्जनांनी बाळगू नये. <ref>[http://www.manogat.com/node/5677 manogat प्रेषक एकलव्य (रवि., १४/०५/२००६ - १७:४६)] page as seen on 29 June 2010</ref>
 
==अभिव्यक्ती म्हणजे ==