"सुविचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो.ब. blanked: spam
No edit summary
ओळ १:
सत्य हे पाहणार्‍यांच्या वा ऐकणार्‍यांच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं ! ते नेहमीच जसं असतं तसंच पुढं येतं. उगवत्या सूर्यासारखं !
 
स्वत:ची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी माणसं किती आहे हे मोजण्याची गरज नाही , आणि दुसर्‍याची इच्छा आणि गरज पुरी करता आली नाही म्हणून अस्वस्थ होणारा विरळाच !
 
दु:खातसुद्धा एक फार चांगली गोष्ट आहे. दु:ख फार लांबले तर त्यात तीव्रता रहात नाही व दु:ख जर तीव्र असेल तर ते लांबत नाही.
 
संसार हा मोडक्या वस्तू नीट करण्याचा कारखाना आहे. तेथे मोडक्या वस्तू जितक्या जास्त असतील तितकी शिकणार्‍याला संधी जास्त असते.
"https://mr.wikiquote.org/wiki/सुविचार" पासून हुडकले