अरविंद घोष
पूर्वायुष्यात स्वातंत्र्य चळवळीत अग्रस्थानी असणारे [[अरविंद घोष]] पुढे योगी श्रीअरविंद या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यामधील ही काही महत्त्वपूर्ण वचने.
- माणसामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे,आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा 'योग' या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.[१]
- भारत स्वतंत्र झाला आहे, पण हे स्वातंत्र्य भेगाळलेले व खंडित आहे. भारताला एकता साध्य झालेली नाही...कोणत्याही मार्गाने का होईना, पण हे विभाजन नाहीसे झाले पाहिजे आणि तसे ते होईल.[२]
- प्रकृतीचे एक दिवस संपूर्ण रूपांतरण घडून येईल ही केवळ आशा नाही तर तो दृढ विश्वास आहे.[३]
- अतिमानस हे सत्य आहे आणि वस्तुजाताच्या प्रकृतीमध्येच त्याचे आगमन अनिवार्य झाले आहे.[४]
- धार्मिक विचारांमधील आणि अनुभवांमधील निम्नता, संकुचितपणा आणि उथळपणा बाजूला सारा. विशाल अशा क्षितिजांपेक्षाही व्यापक व्हा, सर्वोच्च कांचनगंगेपेक्षा देखील उन्नत व्हा, सर्वात खोल अशा समुद्रापेक्षाही अधिक अगाध व्हा.[५]
- तुमच्यातील एखादा जरी भाग ह्या विश्वाशी निगडित असेल तर आणि तोवरच हे विश्व तुम्हाला त्रास देऊ शकते. जर तुम्ही पूर्णत: ईश्वराचेच होऊन गेलात तरच, तुम्ही मुक्त होऊ शकता.[६]
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 23 : Pg 06)
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 36 : Pg 475)
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 29 : Pg 404)
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 35 : 334)
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 12 : 434)
- ↑ (Collected Works of Sri Aurobindo Vol 29 : 76)